निवडणूक निरीक्षक श्री राहुल मिश्रा घेणार उमेदवार यांच्या खर्चाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
98 पाथरी विधानसभा
निवडणूक निरीक्षक ( खर्च ) श्री राहुल मिश्रा आज 98 पाथरी विधानसभा निवडणूक साठी उभे असलेल्या 14 उमेदवार यांनी आतापर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाचा प्रथम आढावा घेणार आहेत. उमेदवारांना निवडणूक खर्च नोंदणी साठी खर्च नोंदवही देण्यात आलेली आहे त्या मध्ये निवडणूक साठी झालेल्या खर्चाची नोंदणी उमेदवारास करावी लागते त्या खर्चाचे प्रथम तपासणी आढावा दि.8 नोव्हेंबर द्वितीय 14 नोव्हेंबर व तृतीय 19 नोव्हेंबर अशी तीन वेळेस निवडणूक निरीक्षक (खर्च ) यांच्या कडून होणार आहे याची नोंद उमेदवार यांनी घ्यावी व दि.8 नोव्हेंबर 24 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय पाथरी येथे उपस्थित राहावे.तसेच याच ठिकाणी या बैठकीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी हे निवडणुकी बाबत पुढील होणाऱ्या निवडणूक कामाविषयी मार्गदर्शन , ईव्हीएम सिलिंग , मॉकपोल प्रक्रिया , आदर्श आचारसंहिता या बाबतीत मार्गदर्शन करणार असल्याने उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय पाथरी येथे वेळेवर उपस्थित राहण्याचे अवाहन श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी केले आहे.