अभाविपच्या “आम्ही ग्रामरक्षक अभियान”ला जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोना लसीकरण, आरोग्य विषयक काळजी याबद्दल केली जनजागृती
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे Covid-19 च्या काळामध्ये विविध सेवा कार्य शैक्षणिक व सामाजिक कार्य हे विद्यार्थी परिषद करत आहे. रक्तपुरवठा, अन्नदान व समुपदेशन,साहित्य पुरवठा कार्य करत आहे यासोबतच तिसऱ्या लाटेचा धोका बद्दल विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे ग्रामीण भागामध्ये जाऊन लसीकरण जनजागृती, निर्जंतुकीकरण(Sanitization), थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन चेक, आरोग्य विषयक माहिती पुरविण्याचे कार्य “आम्ही ग्रामरक्षक” या अभियाना अंतर्गत गेल्या पंधरवड्यापासून करत होते जवळपास जिल्ह्यातील विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ,महिला, युवा व प्रौढ नागरिक यांना आरोग्य विषयक माहिती दिली.जिल्ह्यातील जवळपास कार्यकर्ते हे रोज आपली सेवा या गावांमध्ये जाऊन प्रामुख्याने चंद्रपुर, ब्रह्मपुरी, वरोरा, जिवती, भद्रावती, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर,नागभिड या तालुक्यांमध्ये हे अभियान यशस्वी झाले या अभियानात नऊ तालुके 56 गाव, एकूण 8589 कुटुंब, 21652 व्यक्ती, जिल्ह्यातील एकूण 23 सेवा वस्ती, व या अभियानात एकूण 74 विद्यार्थी व 36 विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला व जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हे अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले या अभियानात विविध अनुभव पण कार्यकर्त्यांना मिळाले.ग्रामीण जीवन पद्धती, रूढी, परंपरा, संस्कृती, जिवणालोकन अनुभवायला मिळाला. गावकऱ्यांना कोरोना बद्दल व लसीकरणा बद्दल विविध भ्रम होते त्यांना दूर करण्यात आले व नागरिकांनी या अभियानाला खूप छान सहकार्य केल. या अभियानाच्या यशस्वी ते बद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मनःपूर्वक आभार मानले. व या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, जिल्हा संघटन मंत्री दामोदरजी द्विवेदी, जिल्हा अभियान प्रमुख अमोल मदने, जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षिणे, नगरमंत्री तृप्ती गिरसावळे, महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर, सौरभ साखरकर, रवी शर्मा, अंकित मोगरे, आदित्य गारगाटे, सानिया पठाण, निधी राखुंडे, नाझीया पठाण, छकुल पोटे, छकुली गेडाम, सायली पोटदुखे, अक्षता माहुरे,वैष्णवी चामाटे, स्वाती हनुमंते, लोकेश घाटे, रोहित चामाटे, प्रतीक दाते, ओम हनुमंते, करण चिकटे, आदी अभाविप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या अभियानाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.