ताज्या घडामोडी

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

प.पू. श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर, श्री साई स्मारक समिती, पाथरी आषाढी एकादशीनिमित्त नेहमीचे कार्यक्रम श्रीसाईबाबांची काकड आरती, पाद्य पूजा, अभिषेक, साई सत्यनारायण व शिर्डी माझे पंढरपुर ही नित्याची आरती करण्यात आली बाबांना श्वेत वस्त्र तुळशीचा हार अर्पण करण्यात आले दुपारी १२:०० वाजता श्री साईबाबांची माध्यान्ह आरती झाली माध्यान्ह आरती नंतर समितीचे कार्यकारी विश्वस्त मा.अॅड. श्री अतुलराव चौधरी यांच्यावतीने साबुदाण्याची उसळ व केळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. माध्यन्ह आरती व महाप्रसादासाठी अंदाजे 3500 भक्त संख्या होती. दुपारी ०३:०० ते ०५:०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य महामंडलेश्वर श्री ह भ प . हरीश चैतन्य महाराज १००८ यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. या किर्तनास मृदंग महामेरू पार्थपूररत्न सुरेश महाराज अब्दल यांनी व परिसरातील भजनी मंडळींनी साथ संगत केली. किर्तनाला मोठ्या संख्येने जनसमुदाय होता.

अशी माहिती श्री साई स्मारक समितीचे प्रताप आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close