ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणूक ईव्हीएम कॅंडिडेट सेटिंग सिलिंग साठी निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर 24 रोजी होत असून मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम होय ! पाथरी विधानसभा मतदारसंघात 415 मतदान केंद्र असून त्यासाठी 415 ईव्हीएम व राखीव 20 टक्के 83 असे एकूण 498 ईव्हीएम मशीन लागणार आहे त्याची सिलिंग साठी प्रशासनाकडून 35 टेबलवर सिलिंग काम होणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम सोमवार दुपारी दोन वाजता घेण्यात येणार आहे तसेच पाथरी विधानसभा साठी 14 उमेदवार निवडणूक लढवीत असून त्यांना दिलेले निवडणूक चिन्हांचे मतपत्रिकाची छपाई पूर्ण झाली आहे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेली मतपत्रिका बॅलेट युनिट वर बसविणे व त्याला कंट्रोल युनिटशी जोडणी करणे ईव्हीएम वर 14 उमेदवार व एक नोटा असे 15 बटन ऍक्टिव्ह करणे व उमेदवारांचे निवडणूक निशाणी ईव्हीएम कॅंडिडेट सेटिंग व ईव्हीएम सिलिंगची महत्वपूर्ण प्रक्रिया दिनांक 12 नोव्हेंबर (मंगळवार )रोजी शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था पाथरी ( आयटीआय ) येथे सकाळी 7 वाजेपासून सुरू होणार असल्याने ईव्हीएम सिलिंग पाहण्यासाठी उमेदवारांनी स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close