ताज्या घडामोडी

धरण उशाला कोरड घशाला;रोहित्र जळाल्याने वाघाळा वाशियांची पाण्या साठी वनवन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

समुद्री चहुकडे पाणी,पिण्याला थेंब ही नाही अशी आणि गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरीला प्रचंड पाणी असतांना मागिल दिड दोन महिण्या पासुन वाघाळा ता.पाथरी येथील पाणी पुरवठा करणा-या विहिरीला विज पुरवठा करणारे गावठाणातील रोहित्र गावात पाणी पुरवठा सुरू नसल्याने नागरीकांची पाण्या साठी वनवन सुरू असून या विषयी गावातील नागरीकां मधून विजवितरण विरोधात संताप व्यक्त होत आहे.

पाथरी तालुक्यातील वाघाळा गाव जवळपास पाच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले गाव असुन गावाला पाणी पुरवठा करण्या साठी लहाण मोठ्या तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या तीन ही पाण्याच्या टाक्यांना एकाच विहिरी तुन प्रभाग निहाय एक दिवस आड पाणी मिळते. या पाणी पुरवठ्याच्या विहिरी साठी विज पुरवठा करणा-या डिपी वरील रोहित्र मागिल दिड दोन महिण्या पासुन जळाले असून या विषयी सरपंच बंटी पाटील आणि ग्रामस्थांनी ही विजवितरण च्या अभियंत्यांना विनंती करून ही आजपावेतो रोहत्र न बसवल्याने एैन पेरणीच्या लगबगित वाघाळा ग्रामस्थांची पाण्या साठी वनवन भटकंती सुरू आहे.

या विषयी सरपंच बंटी पाटील यांना विचारणा केली असता. संबंधित अभियंता हे पाणी पुरवठ्याच्या तीन रोहित्रांचे बिल भरा असे सांगत असून प्रत्येक्षात तीन रोहित्र नाहित. असल्यास त्यांनी दाखऊन द्यावे. ज्या रोहित्रावरुन पाणी पुरवठ्याला विज पुरवठा होतो त्या साठी ग्रामपंचायत पन्नास हजार भरण्यास तयार आहे. उर्वरीत बाकी पैसे जसे उपलब्ध होतील किंवा ग्रामस्थां कडून कराची वसुली झाल्यास भरले जातील असे सांगुन ही ते आपल्या भुमिकेवर अडून असल्यानेच नागरीकांना ना हक त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हणाले. विजवितरणच्या वतीने वर्षभरात दोनतीन वेळा गावात विजबिल वसुली अभियान राबऊन वसुली केली जाते.नागरीक ही प्रतिसाद देतात मात्र अभियंत्याची अशी अडेल तट्टू भुमिका योग्य नसल्याचे ही ते तेजन्यूजशी बोलतांना म्हणाले.

वाघाळा गावा साठी विज पुरवठा करणारे पाच ते सहा रोहित्र असून विजवितरण चे अधिकारी वर्षातुन दोनतीन वेळा वसुली अभियान राबवतात,नागरीक वसुलिला प्रतिसाद देतात मात्र विजवितरण कडून नागरीकांना साधी सेवाही मिळत नसल्याची तक्रार वाघाळा ग्रामस्थ जाहिर पणे करत आहेत. गावाला विज पुरवठा करणा-या एकाही डिपीत फ्युज नाहित सगळा पसारा उघडा असुन रॉड गेला तरी ग्रामस्थ लोकवर्गणी करून टाकत असल्याचे सांगितले जाते. विजवितरणला सहकार्य करून सुध्दा अभियंते अडेल तट्टूची भुमिका घेणे कितपत योग्य आहे असा सवाल वाघाळा ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

ग्रामपंचायत बिला पोटी देत असलेलेले पन्नास हजार आणि इतर शेतकरी रहिवाशी यांच्या कडून बिला पोटीची रक्कम वसुल करावी तत्पुर्वी पाणी पुरवठ्याच्या विहिरीचा विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी वाघाळा ग्रामस्थां मधून होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close