चिमूर तालुक्यासह महाराष्ट्रातील उमेदच्या महिला, कॅडर व कर्मचारी मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक कोटी राख्या
प्रतिनिधीःहेमंत बोरकर
उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अभिनव उपक्रम
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस श्री. अजित पवार व ग्रामविकास मंत्री श्री. गिरीश महाजन यांना एक कोटी राख्या पाठवण्याचा उपक्रम उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना अंतर्गत करण्यात येणार आहे.
महिलांबाबत घेतलेले निर्णय व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री जास्तीत जास्त योजना आणत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा वाटप योजना, एसटी प्रवास योजना, अशा अनेक प्रकारच्या योजना आणल्यामुळे मुख्यमंत्री आपले मोठे भाऊ आहेत. अशी भावना महाराष्ट्रातील महिलांमध्ये तयार होत आहे.
चिमूर तालुक्यासह महाराष्ट्रातील स्वयंसहायता समूहाच्या महिलामार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव खेड्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना एक कोटी राख्या पाठवण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे महिलांमध्ये सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या 19 ऑगस्ट 2024 राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘चलो मुंबई’ असा नारा महिला गावोगावात देत आहे. मुंबईतील मुख्यमंत्री यांचे वर्षा बंगल्यावर उमेद संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती उमेद महिला कॅडर तालुकाध्यक्ष सौ. रज्जूताई ठाकरे, तालुका कर्मचारी कार्यकारणी अध्यक्ष हेमचंद बोरकर, राजेश बारसागडे, रजनी खोब्रागडे, मेघदिप ब्राह्मणे, विवेक हरणे, सुरेश धारणे, ईश्वर मेश्राम, सुधिर ठेंगरी, दिपाली दोडके व स्वप्ना उराडे यांनी दिली.