ताज्या घडामोडी

नागभीड जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत ईसमाचे प्रेत

मृतक खेमराज कापसे कोटगाव

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल परिसरात ईसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
खेमराज सखाराम कापसे वय ५४ रा. कोटगाव , ता. चिमूर हल्ली मुक्काम टाकळघाट जि. नागपूर असे म्रूतकाचे नाव असून ते दि. २३/०८/२०२१ ला शेतीच्या कामासाठी टाकळघाट वरुन कोटगावला येण्यासाठी निघाला होता, दि. २४/०८/२०२१ ला त्याने भी. उमरेड ला असल्याचे घरी फोनवर सांगितले होते, दि. २९/०८/२०२१ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल शिवारात त्यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत संबंधित वनरक्षकाला दिसला, वनरक्षक यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे माहिती दिली. नागभीड पोलीसांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली, म्रूतक च्या जवळ इलेक्शन कार्ड आढळून आला त्यावरून ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली असता म्रूतकाचा मुलगा अक्षय याने घटनास्थळी येउन ओळख पटवीली , व शवविच्छेदन करीता प्रेत ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाढीवा करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close