ताज्या घडामोडी

जायकवाडीचे पाणी मुदगल उच्चपातळी बंधा-यात सोडण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी:-जस जशी उन्हाची तिव्रता वाढत आहे तशी पाणी टंचाईच्या झळा ही पाथरी तालुक्यात तिव्र होतांना दिसत असून मुदगल येथील उच्चपातळी बंधारा पुर्णत:कोरडा झाल्याने सोनपेठ शहरा सह अनेक गावांची तहान भागवना-या मुदगल येथील उच्चपाळी बंधा-यात बी ५९ चारी व्दारे जायकवाडीचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामसभेच्या ठरावा व्दारे वाघाळा ग्रमपंचायतीच्या वतीने सरपंच बंटी पाटील यांनी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी आणि जायकवाडी पाटबंधारे उपविभागीय अभियंत्या कडे ३ एप्रिल रोजी केली आहे.
गत खरीप हंगामात पाथरी आणि बाभळगाव मंडळात सरासरीच्या अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने भुगर्भात पाणी साठवण झाली नसल्याने नोव्हेंबर,डिसेंबर महिण्या पासुनच पिण्याच्या पाण्या सह जनावरांच्या चा-याचा प्रश्न ही मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे शेतकरी आणि ग्रामस्थ सांगत आहेत. नदी,नाले,ओढ्यांना कोरड पडलेली असल्या कारणाने वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांना ही पाण्या साठी गाव शिवारात वनवन भटकंती करावी लागत आहे. मार्च महिण्याच्या मध्या पासुनच गावागावात पाण्याची टंचाई तिव्र होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पाऊसमान कमी झाल्याने मुदगल उच्चपातळी बंधारा ही पुर्ण क्षमतेने भरला नव्हता. मार्च महिण्याच्या मध्यातच मुदगल बंधारा पुर्ण पणे कोरडा पडल्याने या बंधा-यावर सोनपेठ शहरा सह पाथरी आणि परळी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागत असल्याने या बंधा-यात बी ५९ चारी ने फुलारवाडी येथून ओढ्या व्दारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी वाघाळा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत ठराव घेऊन करण्यात आली आहे. तसेच जनावरांना पिण्या साठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन नदी,ओढे,नाले या मध्ये बी ५९ चारी च्या कालव्यां व्दारे पाणी सोडून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या ठरावा व्दारे करण्यात आली आहे.पाथरी आणि बाभळगाव मंडळ शासनाच्या वतीने नोव्हेंबर महिण्यात दुष्काळी म्हणून जाहिर केलेले आहे. या भागात चा-याची तिव्र टंचाई असून चारा पिकाला ही या पाण्याचा फायदा होणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने १ एप्रिल पासुन रोटेशन पद्धतीने पाणी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. बी ५९ या चारीवर देवनांद्रा,बांदरवाडा, पाथरी, पुरा, तुरा, गुंज, मसला, टाकळगव्हाण, जैतापुरवाडी, कान्सूर, गौंडगाव, लोणी,बाबुलतार, बाभळगाव, सारोळा, पिंपळगाव, वाघाळा, फुलारवाडी, बनई, लिंबा, विटा, मुदगल,वझुर,कुंभारी, वांगी,रामपुरी,ढालेगाव, खेर्डा या शिवारात पाणी मिळते. या संपुर्ण गावात आता पाणी टंचाई तिव्र होत असल्याचे शेतकरी आणि ग्रामस्थ सांगत आहेत. त्या मुळे पाथरीच्या जायकवाडी उपविभागाने त्वरीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close