चिमुकल्या बालकांच्या कलागुणांना वृद्धिंगत करण्यासाठी स्नेह संमेलन व बालआनंद मेळावा संपन्न

च
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
भिसी येथिल श्री साई कॉन्व्हेन्ट,
जीविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज यांचे वतीने चिमुकल्या बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन व बालानंदमेळावा पार पडला श्री विठ्ठल रुखमाई देवस्थानं भिसी च्या सभागृहात आयोजित स्नेहसंम्मेलन व बालआनंद मेळाव्यात चिमुकल्यांनी एकापेक्षा एक अशी सरस नृत्य सादर करून भिसीवासियांना चांगलेच रिझविले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन नागपूर विभाग शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले व इतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या सौ ममता डुकरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद पिसे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे अधिसभा सदस्य विजयकुमार घरत केंद्रप्रमुख तुळशीराम महल्ले आंबेनेरी केंद्राचे केंद्रप्रमुख ताराचंद रामटेके आदर्श जनता कनिष्ठ महाविद्यालय भिसी मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री नवखरे, श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी चे अध्यक्ष गरिबाजी निमजे, नवोदय विद्यालय निवड समिती सदस्य डॉ. श्याम हटवादे माजी प स सदस्य प्रदिप कामडी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर बाजार समिती माजी संचालक घनश्याम डुकरे, प्रा. झाडे, प्रा. निखाडे,प्रा. गौरकर, प्राचार्य डॉ. विजय हेलवाटे चिमूर तालुका दैनिक देशोन्नती प्रतिनिधी मनोज डोंगरे, ज्येष्ठ नागरिक रमेश गवरी, सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडीवार हे होते प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली उपस्थीत मान्यवरांनी नर्सरी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले दरम्यान यशोदा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व संस्थेद्वारा संचालित श्री साई कॉन्व्हेन्ट, जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज चे वतीने नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयाची सत्र 2022-2023 ची 12 वि ची विद्यार्थिनी कु. प्रणाली संतोष भूजाडे हिचा चिमूर तालुक्यातून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक घेऊन महाविद्यालयाचे नाव रोषण केले त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव किशोर आष्टनकर यांनी संस्था स्थापना व कॉन्व्हेन्ट तसेच महाविद्यालय स्थापनेचा संघर्षमय प्रवास व उद्देश सांगून आपला विदयार्थी स्पर्धेच्या युगात कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये म्हणून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात यांची माहिती दिली.
अधिसभा सदस्य विजयकुमार घरत यांनी आपल्या भाषणात शाळेच्या प्रगतीत सर्वांचाच सिंहाचा वाटा आहे या महाविद्यालयातून उत्कृष्ट विद्यार्थी घडत आहेत आणि यापुढे सुध्दा घडत राहतील अश्या अपेक्षा व्यक्त करून शुभेछ्या दिल्या केंद्रप्रमुख तुळशीराम महल्ले व ताराचंद रामटेके यांनी सुध्दा आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थांना मार्गदर्शन केले
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात शाळेचा संघर्षमयप्रवास पाहता मी सुध्दा शाळेला शक्य ती मदत करून शाळेच्या प्रगतीत हातभार लावेल असे सांगितले.
तर अध्यक्षीय भाषणात ममता डुकरे यांनी महाविद्यालयास व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉन्व्हेन्ट तसेच महाविद्यालयाच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज शेख यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंका शेंदरे यांनी केले.