आनंद निकेतन महाविद्यालयातील रेड रिबन क्लब तर्फे राष्ट्रीय सेवा योजना पथकांचे सुयश

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती आनंदवन व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय वरोरा तसेच रेड रिबन क्लब यांच्या विद्यमाने आयोजित वरोरा तालुका स्तरीय पोस्टर स्पर्धा, स्लेफी विथ स्लोगन, एक मिनिट प्रोमोशनल विडीओ या स्पर्धा रक्तदान या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दि ४ एप्रिल २२ रोज सोमवारी दुपारी एक वाजता बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड. याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर आनंद निकेतन महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रंजना लाड, श्री. सतिश येडे. आरोग्य साहाय्यक, श्री उमाकांत जवादे. एल टी, श्रीमती. सोनाली गायकी. एल टी, श्रीमंती. प्रियांका राँय. ए एन एम टि ए, श्रीमंती. चंदा बोबडे एल. टी., श्री. गोवीद कुंभारे. समुपदेशक, श्री.संकेत कायरकर यांचीही विशेष उपस्थित होती. या वेळी कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ.रंजना लाड यांनी सांगताना चंद्रपूर जिल्हा रेड रिबन क्लब व्दारा जिल्हा स्तरीय एड्स जनजागृती पथनाट्य स्पर्धेत आनंद निकेतन महाविद्यालय मागील ४-५ वर्षांपासून प्रथम क्रमांक पटकावित आहेत यांनी केले. तसेच जनजागृती उपक्रम अभियानाकरता वरोरा तालुक्यातील परसोडा, दादापुर, सालोरी, टेमुर्डा, व डोंगरगांव (रेल्वे) या सर्व गावात पथनाट्यातून एड्स व व्यसनमुक्ती ची जनजागृती केली आहे समाजात आरोग्यदायक सदैव जागृती कायम असावी या करता महाविद्यालयाचे कार्य सदैव प्रयत्नशील आहेत असे प्रतिपादन व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड. यांनी ही याप्रसंगी कोरोना व्हायरस सारख्या एड्स अशा सुक्ष्म रोगाविषयी माहिती व त्यांच्या प्रसार कसा होतो तसेच त्यावरील उपाय सांगुन मार्गदर्शन केले. नंतर विजेत्या विद्यार्थी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यामध्ये पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. धनश्री दरवे, व्दितीय क्रमांक कु. ॠषब गुरनुले, तृतीय क्रमांक कु. वैष्णवी गावंडे. यांनी पटकाविले. तर यात प्रोत्साहनपर म्हणून श्री. हेमंत भुजाडे, कु. जया आगलावे, कु. रिना काळे, कु. मानसी तेलहांडे. तसेच एक मिनिट प्रोमोशनल विडीओ स्पर्धा प्रथम क्रमांक कु. वैष्णवी गावंडे, व्दितीय क्रमांक सोहम उमाकांत जवादे, तृतीय क्रमांक श्री. प्रज्वल गावडे. यांनी पटकाविले. तर यात प्रोत्साहनपर म्हणून कु. जानवी किन्नाके, कु. कोमल मिलमीले, कु. प्राजक्ता किन्नाके. यांचा ही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सोनाली गायकी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.