कृषीपुत्रांनी केले सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित, महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे कृषी शिक्षण घेत असलेल्या कृषीपुत्रांनी पाचगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व मृदा संवर्धन संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
वाढत्या रासायनिक खताचा वापर लक्षात घेता कृषीपुत्रांनी विविध सेंद्रिय शेतीचे तत्वे व महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर कृषीपुत्रांनी आधुनिक मृदा संवर्धनाच्या विविध तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीच्या साह्याने आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करण्याचे आव्हान देखील कृषीपुत्रांनी शेतकऱ्यांना केले.
ही सेंद्रिय शेतीवरील कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, डॉ.रामचंद्र महाजन (प्रमुख ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम), डॉ.स्वप्नील पंचभाई (समन्वय ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम) तसेच सेंद्रिय शेती क्षेत्रात निपुन असलेले डॉ. सतीश इमळे व डॉ.रामचंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीपुत्र वरप्रसाद जैन, मनीष गुंडावार, रोशन खांडरे, शुभम जायभाये, वैभव जाधव,विष्णु काकडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.