ताज्या घडामोडी

“त्या ” फसविणा-या टोळी पासून सावध राहा

निलेश पाझारेंचे दिव्यांग बांधवांना आवाहन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगांना फसवणारी टोळी सक्रिय झाली असून टोळीतील फसविणा-या व्यक्ती बाबत सावध राहावे असे आवाहन निलेश पाझारे यांनी आज केले आहे.
महाराष्ट्र शासना तर्फे दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा देण्यात आले आहे. याच बरोबर समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषदने देखील ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्तींना ५ टक्के योजनेची मंजूर यादी पंचायत समितीला प्रसिद्ध केलेली आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा घेवून काही दिव्यांग व्यक्तींना फसवणारी टोळी सक्रीय झाली आहे. ते दिव्यांग व्यक्तींना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून आम्ही तुम्हाला योजना मंजूर करून देवू असे सांगत आहे. इतकेच नाही तर काही दिव्यांग व्यक्तींना सांगण्यात येत आहे कि तुम्हाला स्कूटर मंजूर झाली आहे. तुम्हाला या साठी ५०० ते १००० रुपये खर्च करावा लागेल किंवा तुम्ही आमच्या संघटन सोबत जुळावे लागेल त्यासाठी सदस्य फी भरावी लागेल. आमची वरपर्यंत ओळख आहे असे सांगून व दिव्यांगांना अधिकाऱ्यांसोबत काढलेले स्वतःचे फोटो दाखवून सांगत आहे की आम्ही तुमची योजना अधिकाऱ्यांना सांगून मंजूर करून देऊ अन्यथा तुम्हाला योजना मंजूर होणार नाही. अशी बतावणी करून दिव्यांग व्यक्तींकडून रक्कम उकळण्यात येत आहे. अश्या फसवणा-या टोळी पासून दिव्यांग बांधवानी सावध व्हावे .
उपरोक्त फसवणारी टोळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड या भागात सक्रिय असल्याचे बोलल्या जात आहे. दिव्यांग बांधवांनी अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा समाज कल्याण विभाग, चंद्रपूर येथे तातडीने संपर्क साधून माहिती घ्यावी. असे चंद्रपूरचे निलेश योगेश पाझारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close