पेरमिली येथील जि.प. शाळेतील नवीन वर्ग खोलीचे भूमिपूजन संपन्न
जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत पेरमिली येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या भूमिपूजन श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे ,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,पेरमिली ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.किरणताई कोरेत,उपसरपंच श्री.सुनील सोयाम,मेडपलीचे सरपंच श्री.निलेश वेलादी,माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.प्रमोद आत्राम,ग्राम पंचायत सदस्य श्री.साजन गावडे,आदिवासी विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते श्री.अशिफ खाँ पठाण,कवीश्वर चंदनखेळे,प्रशांत गोडसेलवार,तुळशीराम चंदनखेळे गजानन सोयाम,सचिव श्री.मेश्राम व नागरिक उपस्थित होते.