वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या डोर्ली येथील नागरिकाला पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांच्या कडुन आर्थिक मदत
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
ब्रम्हपुरी तालुक्यातील डोर्ली येथील अरुण नारायण ठाकरे हे आपल्या घरचे पाळीव जनावरांना चराईसाठी गावालगत असलेल्या जंगलात घेऊन गेले होते. तेव्हा त्यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. सध्यस्थितीत ते आरमोरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत.
सदरची बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार यांना कळताच त्यांनी आपल्या वतीने कार्यकर्त्यांच्या मार्फतीने सदर जखमी इसमाला आर्थिक मदत पाठवली.
सदर आर्थिक मदत देतांना ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटीचे कार्याध्यक्ष प्रभाकरजी सेलोकर, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, ब्रम्हपुरी येथील पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, ज्ञानेश्वर झरकर यांची यावेळी उपस्थिती होती.