विठ्ठलवाडा येथिल उपद्रवी वानराला वनविभागाने केले जेरबंद
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपीपरी
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा गावात मागील काही दिवसापासून वानराचा उपद्रव सुरू असल्याने नागरिक त्रासले होते. दररोज वानर नागरीकांच्या घरात शिरून घरातील वस्तू व इतर खाद्य पदार्थाची नासधूस करीत
घरालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर बस्थान मांडून राहत असे. दररोज घरात शिरून खाद्यपदार्थासह इतर घरातील वस्तूची नासाडी करणे हे नित्याचेच झाले असल्याने
वानराकडून होणाऱ्या या उपद्रवामुळे नागरिक अक्षरशः कंटाळले होते.
वानराचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली असता
आज दि.12 मार्च रोज शनिवारला वनविभागाचे पथक गावात दाखल झाले.आणि बंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.त्यात केळी व फुटाणे,पोळी इत्यादी खाद्यपदार्थ पिंजऱ्यात ठेवून पिंजर्याचे प्रवेश द्वार खुले करून वन विभागाचे पथक नजर ठेवून होते. दरम्यान
काही वेळातच चिंचेच्या झाडावरून वानर खाली उतरत वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला.
मागील कित्येक दिवसापासून त्रास देणाऱ्या वानराला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात बंदिस्त केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.