ताज्या घडामोडी

फुले ,शाहू ,आंबेडकर यांचे विचार देशाच्या ऐक्यासाठी प्रेरक -जि .के .उपरे

आवारपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा निर्मितीचे शिल्पकार गौतम धोटे यांची उपस्थिती!

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महात्मा ज्योतीराव फुले , शाहु , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असून आदर्श समाज निर्मिती सोबत देशाच्या ऐक्यासाठी प्रेरक आहेत. त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रत्येकाने त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे असे प्रतिपादन जि. के .उपरे यांनी केले
कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील बुध्द जयंती आणि सिध्दार्थ बुद्ध विहीर लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या बुद्ध जयंती व सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून राजूरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे हे होते . या शिवाय या कार्यक्रमाला
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता जि.के,उपरे , एम . टी . साव, संघा साव, कविता मडावी , यशवंत कवाडे , चेतन उंदिरवाडे , किशोर सबाने , निरंजन जामगाडे , चंद्रमणी धोटे , सत्यवान दिवे , कोरपना येथील कांग्रेसचे एकमेव युवा नेताआशिष देरकर, अभय मुनोत, राहूल बोढे, हारून सिद्यिकी उपस्थित होते. मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय भाषण करतांना आ.धोटे म्हणाले की येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सदैव स्मरणात राहो . त्यांनी दाखविल्या मार्गाने जाण्याची ऊर्जा प्राप्त होवो या उद्देशाने मी (या क्षेत्रातील) आमदार असल्याने मदत करीत राहिल.आवारपूर येथील सर्व बौद्ध समाजाने गावातील व परिसरातील बौद्ध कुटुंबाकडून वर्गणी गोळा करून भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ही बाब अतिशय प्रशासंनीय
असल्याचे मान्यवर मंडळी यावेळी म्हणाली .मंडळाच्या वतीने जि,श.के. उपरे यांचे सह आमदारांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिला धोटे यांनी केले तर संचालन डंभारे यांनी केले .उपस्थितीतांचे आभार केशव वानखेडे यानी मानले , पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ वानखेडे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्नम घेतले .आवारपूरात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासाठी गौतम धोटे , दर्शन बदरे , रमेश खाडे, प्रमोद चांदेकर यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीतीचे अध्यक्ष गौतम धोटे , दर्शन बदरे सचिव ,व आई रमाई मंडळ यांचे वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन कार्यक्रमास आरंभ झाला शिला धोटे चेतना खाडे , लताबाई वानखेडे, धम्मबाई जिवने , शुध्दलेखा खाडे, शितल ठमके, सविता बदरे आदींनी सुभाष भाऊ धोटे यांचे स्वागत केले .
संध्याकाळी . भोजन दान आणि महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायीका प्रमोदिनी साठे वर्धा यांचा सामाजिक भीम व बुद्ध गित प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला, दोन्ही कार्यक्रमाला स्थानिक परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्रपाली महिला मंडळ, आई रमाई महिला मंडळ आणि सर्व बौध्द बांधवांनी अथक परिश्रम घेतले. बुद्ध जयंती निमित्त सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा साजरा करण्यासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close