ताज्या घडामोडी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास केली अटक

उपसंपादक :विशाल इन्दोरकर


लखमापूर छत्तीसगढ़ी मोहल्ला चंद्रपूर येथील रुकधन किराणा दुकान मालक नामे रुकधन परसराम साहु याने त्यांचे घरी देशी बनावटीची अग्निशस्त्र घेऊन लपवुन ठेवले आहे. अशी खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार .सदर ठिकाणी तत्काळ ठिकाणी रवाना झाले मिळालेली माहिती अनुसार रुकधन किराणा दुकान येथे पोहोचून त्याचे दुकानात मालक रुकधन परसराम साहु वय 52 वर्ष रा. लखमापूर वार्ड क्रमांक 3 चे छत्तीसगढ झोपडपट्टी, चंद्रपूर यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरझडतेमध्ये एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळून आली.

त्यांचे अंदाजित किंमत ( 10,000) दहा हजार रुपये आहे मिळालेली देशी पिस्तल पांचा जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अरविन्द साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोकडे, पो.उप. नि. संदीप कापडे, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बवरी यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close