ताज्या घडामोडी

पाथरीत ११ लाख २३ हजाराचा गुटखा जप्त

सात आरोपीवर पाथरी पोलीसात गुन्हा दाखल.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी शहरातील एकता नगर येथून ११ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून या बाबत सात आरोपीवर पाथरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाथरी शहरातील एकता नगर येथील एक टिन पत्र्याच्या शेड मध्ये गुटखा असल्याची माहीती पोलासांना मीळाली या मध्ये परभणी आणि पाथरी येथील पोलीसांनी दि २७ जूले बुधवार रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान धाड टाकली असता या मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला ११लाख २३ हजार दोनशे रुपये किंमतीचा राजनिवास पानमसाला आणि सुगंधी पानमसाला गुटखा पकडण्यात आला असून,
या प्रकरणी परभणी चे पोलीस ऊप निरीक्षक व्यंकट रामचंद्र कुसमे यांच्या फिर्यादीवरून आरोपी परवेज पठाण रा.जायकवाडी वसाहत पाथरी, मतीन अन्सारी रा.एकता नगर पाथरी, फय्याज फारोखी रा.बांदरवाडारोड पाथरी, जमील अन्सारी रा.एकता नगर पाथरी, शकील अन्सारी रा.एकता नगर पाथरी, अलताफ तांबोळी रा. साईबाबा मंदीर जवळ पाथरी, सुनील मनोहर जाधव रा.नामदेव नगर पाथरी आदीवर कलम ३२८, २७२, २७३, भादवी ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यातील पी एस आय जी.एन.कराड हे अधिक तपास करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close