ताज्या घडामोडी

विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये श्रीमती एस एस के के व्ही विद्यालयाच्या संघास उपविजेतेपद

जिल्हा प्रतिनिधी:अन्सारी अहमद परभणी

दि.23 सप्टेंबर 2023 रोजी बीड येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा 17 वर्ष वयोगटात SSKKV मानवत संघाने उपविजेते पद पटकावले.
संघातील खेळाडू अभिषेक इंगळे, प्रज्वल भिसे, शंतनु पारसकर, अथर्व ढालकरी, यश मेहेत्रे व शिवम राठोड, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि उपांत्यपूर्व फेरीमध्ये मनपा परभणी संघाला व उपांत्य फेरीमध्ये छत्रपती संभाजीनगर संघाला हरवून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बीड जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू शकील सर यांचे हस्ते मानवत संघास देण्यात आले.
या खेळाडूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार, संस्थेचे सचिव बालकिशन भाऊ चांडक, सहसचिव अनिल भाऊ नखाते,सर्व संचालक मंडळ आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम.कजेवाड सर पर्यवेक्षक एम.डी.केकान सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ राठी यांनी केले.
या खेळाडूंना यश क्रीडा मंडळ मानवतचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक किशोर तूपसागर आणि विद्यालयाचे क्रीडाविभागप्रमुख गोविंद जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या विजयासाठी यश क्रीडा मंडळाचे वरिष्ठ खेळाडू संकेत सत्वधर, वैभव हरबडे, स्वप्निल कचरे आणि अथर्व गऊल यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close