श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची माजलगाव येथे बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थित ३१ डिसेंबर रोजी माजलगाव येथे व्यापक स्वरूपाच्या बैठकीचे आयोजन .
माजलगाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक शिव तपस्वी आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दि १९ डिसेंबर रोजी माजलगाव येथे तालुक्यातील सर्व धारकरी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांची बैठक घेतली ही बैठक प्रेरणा मंत्र घेऊन सुरू करण्यात आली.
श्रीदुर्गराज रायगड येथे होणाऱ्या ३२ मन सुवर्ण सिंहासन व हिंदवी स्वराज्य खडा पहारा आणि आगामी गडकोट मोहीम , धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास , श्रीदुर्गामाता दौड .या विषयी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी शहरातील व ग्रामीण भागातील सर्व धारकरी, शिवभक्त,मावळे,हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….बैठकीचा समारोप ध्येयमंत्राने झाला.
यापुढे दि ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील सर्व गावामधून प्रत्येकी दोन कार्यकर्ते उपस्थित राहणार हजारो धारकरी मेळावा माजलगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.