आ दुर्राणी यांच्या हस्ते श्रीसाईबाबा मंदिरातून स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात

भाजपा पदाधिका-यांनी फिरवली पाठ.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालया साठी खा संजय जाधव यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय नेते आणि समाजतील सर्व प्रतिष्ठीत मान्यवरांनी उपस्थिती लावत शनिवारी पाथरी येथील श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात श्रींची आरती करून विधानपरिषदेचे आ बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते पहिली स्वाक्षरी करून आंदोलनाच्या पहील्या टप्यातील या मोहिमेला सुरुवात केली.या वेळी भाजपाच्या पदाधिका-यांनी मात्र या वेळी पाठ दाखवल्याचे चित्र दिसुन येत होते.
गेली अनेक वर्षा पासुन परभणीकरांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे. याची राज्य सरकरने घोषणा ही केली मात्र या विषयी सरकार कडून वेळ काढूपणाचे धोरण अवलंबत असल्याची भावना परभणीकरां मध्ये निर्माण झाल्याने आता या विषयी खा संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पक्षियां सह समाजातील सर्व मान्यवर एकत्र येऊन या महत्वाच्या विषयी तिव्रआंदोलनाचे रणशिंग फुंकले असून याचा पहीला टप्पा म्हणून शनिवारी येथील श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात आरती करून आ बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात झाली. या वेळी सेनेचे उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रास्ताविक केले तर आ दुर्रानी यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी बोलतांना आ दुर्रानी म्हणाले की सरकार आपलेच आहे. मात्र या साठी लढा देण्यास आपल्या कडूनच उशीर झाला परंतु आता खासदार साहेबांनी पुढाकार घेत या साठी लढा उभारला आहे. आम्ही कधीच कोणत्याही विकास कामांच्या आड येत नाही.परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालया साठी शेवट पर्यंत खासदार साहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन सोबत राहू अशी ग्वाही दिली.या वेळी प्रत्येकाच्या डोक्यावरील गांधी टोपीवर मी परभणीकर, मिशन गव्हरमेंट मेडीकल कॉलेज असे ठळक लाल अक्षरात लहिलेल्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या वेळी मुख्य रस्त्याने रॅली काढून तीची सांगता सेलू कॉर्नर येथील छत्रपती शिवराय चौकात करण्यात आली या वेळी पुप्पहाराने पुजन करण्यात आले. आणि त्या नंतर शासकीय विश्रामगृहावर नियोजन बैठक संपन्न झाली. ही स्वाक्षरी मोहिम ३१ ऑगष्ट पर्यंत चालणार असून गाव वाडी,तांड्या वर जाऊन स्वाक्ष-या घेण्यात येणार आहेत. या वेळी आ बाबाजानी दुर्रांनी यांच्या सह सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे,युवासेना प्रमुख बाराहाते, उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, कृऊबास सभापती अनिलराव नखाते,जि पचे माजी सभापती,दादासाहेब टेंगसे,डीसीसी बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे,सुनिल उन्हाळे,पं स सदस्य शरद कोल्हे,पिंटू आमले रावसाहेब निकम,माणिक घुंबरे,पांडुरंग शिंदे,टाकळकर,मनसे चे पांडूरंग सोनवने,काँग्रेस चे विश्वनाथ थोरे,साखरे यांच्या सह भाजपा वगळता मोठ्या संखेने सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.