महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या प्रख्यात कवयित्री मालती सेमले यांची निवड
अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन .
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
या वर्षी दि. 25, 26 व27 नोव्हेंबरला आंबोजोगाई जि.बीड येथे होऊ घातलेल्या तीन दिवशीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह कार्यक्रमातील कविसंमेलनासाठी महाराष्ट्रातील निवडक सात निमंत्रित कवींची निवड करण्यात आली आहे.त्यात जि.प.उच्च प्राथमिक शाळा मोखाळा पं.स.सावली.जि.चंद्रपूर येथील शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं गडचिरोली च्या प्रसिद्ध कवयित्री मालती सेमले यांची निवड करण्यात आलेली आहे. समारोहासाठी
सेमले यांची निवड झाल्या बद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे जेष्ठ साहित्यिका मेघा धोटे, मूलच्या वंदना आगरकाठे, चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे, मुग्धा खांडे ,रंजू मोडक , सुविद्या बांबोडे , शंकरपूरच्या कवयित्री वर्षा शेंडे , मूलच्या स्मिता बांडगे, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, पुण्याच्या स्नेहा उत्तम मडावी, राजूराच्या नंदिनी लाहोळे, हैद्राबादच्या विजया तत्वादी, चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे,कु.सायली टोपकर यांचेसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ..