ताज्या घडामोडी

आदिवासी बांधव समाजासाठी एक होन सध्याच्या परिस्थितीत गरजेचे :धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

इ .स 1975 मध्ये आपल्या गडचिरोली ,चंद्रपूर जिल्हा सह विद्यमान तेलंगाना ,छत्तीसगड क्षेत्रातील आदिवासी समाजाचा इतर समाजातील लोकांवर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध व आपला जल जंगल जमीन वाचवण्यासाठी अँग्रेज सरकार विरुद्ध जंगम सेना स्थापन करून चहुबाजूने लढा उभारणारा आदिवासी समाजाचे महापुरुष शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या १८९ व्या जयंती निमित्त आज अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेला विर बाबुराव शेडमाके यांच्या जन्मभूमी असलेल्या किष्टापुर दौंड येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या १८९ व्या जन्मोत्सव च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहेरी विधानसभा चे आमदार श्री.धर्मरावबाबा आत्राम तसेच सह उदघाटन माननीय गोविंदरावजी शेडमाके विर बाबुराव शेडमाके यांचे पंतू ,तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोशन सिडाम सरपंच ग्रामपंचायत किष्टापुर दौंड ,कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल मडावी प्रतिष्ठान नागरिक किष्टापुर दौंड, तसेच कार्यक्रमाला उपस्थित श्री हर्षवर्धनराव बाबा आत्राम पंचायत समिती सदस्य अहेरी हे होते.
शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या 179 वा जन्मोत्सव प्रसंगी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जन्मभूमी असलेला किष्टापुर दौंड येथे उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना समाजासाठी एक होन गरजेचा आहे असा आव्हान केले.
याप्रसंगी आमदार आत्रम पुढे बोलताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी बांधवांसाठी अनेक संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय देण्याचे काम केले .यांच्या भूमिकेवर आज आपला समाज या क्षेत्रांमध्ये या सरकारमध्ये टिकून आहे शेडमाके यांच्या जयंतीला मान देऊन आपण समाजबांधव एकमेकांच्या अडचणीत सोबत राहून समाजाला टिकून ठेवण्याची गरज या आजच्या घडीला दिसून येत आहे असं भावनिक आमदार आत्राम यांनी बोलून दाखवले. तसेच आदिवासी समाजाच्या देशावर नाव गाजवलेल्या शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या अहेरी विधानसभा च्या मध्ये स्थित असलेला अहेरी येथे अंदाजे 13 करोड रुपये खर्च करून एक भव्य स्मारक तसेच आदिवासी बांधवांना कामास येणारा एक भव्य ईमारत उभारण्याचा प्रस्ताव तयार असल्याचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना संबोधित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम यांनी आदिवासी समाजामध्ये फूट पाडणारा राजकीय व्यक्तींना समाजापासून दूर ठेवण्याचे आव्हान समाजापुढे करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित विविध ग्रामपंचायतचे सरपंच आपल्या आदिवासी भाषेचे रचना, गणना करून समाज बांधवांना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेला वीरांगणाची माहिती देण्याचे काम केले .या दरम्यान बालाजी गावडे माजी सरपंच येरमणार, सांबय्या करपेत ,मानताया आत्राम, कैलास कोरेत ,शंकर तोरम, आनंदराव तलांडी, शंकर आत्राम , पंकज तलांडी सरपंच जिमलगट्टा सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जिल्हा परिषद शिक्षक वृंद समस्त आदिवासी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close