ताज्या घडामोडी

आविस कडून अहेरी नगर पंचायत ची शवयात्रा काढुन निषेध

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी राजनगरीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असुन सदर खड्डे बूजवन्याकडे नगर पंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे.
अहेरी नगरीत रस्ते,नाली बांधकाम,घरकुल आदि समस्या आवासुन उभे आहेत मात्र नगर पंचायत प्रशासनकडून दुर्लक्ष केल्या जात आहे,यांबाबत आदीवासी विध्यार्थी सघटनेकडून नगर पंचायत प्रशासनला व अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही.
अहेरी नगरातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असताना उपयोजना करण्यात आले नाही.त्यामुळे अहेरी नगर पंचायतच्या निष्क्रिय कारभारा विरुद्ध आदिवासी विध्यार्थी संघाकडून नगर पंचायतच्या शवयात्रा कडून अहेरी नगरीत मिरवणूक काळण्यात आली व रस्त्यांवरील खड्ड्यात छुरी टाकून बूजवत नगर पंचायत च्या निषेध करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय
नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,खमनचेरूचे सरपंच श्री.सायलू मडावी,पेरमिलीच्या सरपंचा सौ.किरण कोरेत, श्री.आविस शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार, एटापलीचे आविस सचिव श्री.प्रज्वल नागूलवार,माजी सरपंच श्री.प्रमोद आत्राम,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,आलापलीचे माजी सरपंच श्री.दिलीप गंजिवार,ग्राम पंचायत सदस्या सौ,उषाताई आत्राम, मिलिंद अलोने,साईंनाथ औतकर,विलास गलबले,पुनेश कंदीकुरवार,अरफाज शेख,दीपक संगमवार व इतर गावकरी उपस्तीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close