ताज्या घडामोडी
बसपा चे नाना देवगडे यांचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत बाबासाहेबांना अभिवादन
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
देशात हजारो वर्षापासून नांदत आलेल्या वर्णवादी रुढी-परंपरा व्यवस्था बदलून नवीन मानवतावादी व्यवस्था निर्माण करून शोषित, पीडित,वंचित, स्त्री-पुरुष कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सर्व शोषितांचे उद्धार करण्या करिता अनेक संघर्षातून मानवतेवर आधारित राज्यघटना तयार करणारे बहुजनांचे आजीवन प्रेरणास्त्रोत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती प्रीत्यर्थ बसपाचे कार्यकर्ता नाना देवगडे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुमठाना येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच सुमठाणा वार्ड येथील रॅलीला शरबत वाटप करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.