ताज्या घडामोडी

बँक ही सर्वसामान्यांची : – सुनील फुंडे

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोष कर्मचारी सह. पतसंस्था भंडाराच्या ईमारत नुतनीकरणाचे उद्धघाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणुन सुनील फुंडे यांनी मार्गदर्शन करतांना संस्थेच्या कामकाजाबद्दल व केलेल्या आर्थिक प्रगती बाबत आनंद व्यक्त केला. सहकार क्षेत्रात काम करतांना येणार्या अडी अडचणी भविष्यात सहकार क्षेत्रात येणार्या बदलाबाबत आपला अनुभव सांगीतला. नोटबंदी, कर्जमाफी, कर्जमुक्ति, कोरोना कालावधीत बँकींग सुविध सुरळीत दिल्याबद्दल तसेच सन २०२१-२२ मध्ये अल्प मुदती शेती कर्ज वाटपाचे उदिष्ट पुर्ण केल्याने सर्व कर्मचारी वर्गांचे अभिनंदन केले. बँक ही सर्वसामान्य वर्गांची असल्याने बँकेच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यास बँकेची पर्यायाने कर्मचारी वर्गाची सुद्धा प्रतिष्ठा उंचावत असल्याने कर्मचारी वर्गांकडुन नियोजनबद्ध व ज्यादा कामाची अपेक्षा
यावेळी मार्गदर्शन करतांना व्यक्त केली.
बँक सीबीएस प्रणालीत कार्यान्वीत आहे, त्यामुळे बँकींग प्रणालीत जागरुकता ठेवुन प्राप्त सुचनांची त्वरीत व काटेकोर अंमलबजावणीवर जोर द्यावा, असे सांगुन नाताळ व नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांनी सहकार क्षेत्रात काम करतांना पत किती महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले.
तर संस्था अध्यक्ष दिपक डहारे यांनी ईमारत नुतनीकरणा संबंधाची माहिती उपस्थितांना दिली. तर उद्धघाटन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे माजी व्यवस्थापक पांडुरंग नागापुरे यांनी संस्थेच्या मागील ५५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा प्रस्तुत केला. कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष देवचंद कुलकर, सचीव राजेश गडकरी, सर्व संस्था संचालक, संस्था व्यवस्थापक शैलेश पवार, माजी संस्था सदस्य रामभाऊ राघेर्ते, राजेश मदान, संजय पदवाड यांच्यासह जिल्हा मध्यवतीर बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्था संचालक प्रफुल बोहटे यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close