ताज्या घडामोडी

महादवाडी ग्रामपंचायतच्या शीपायांकडुन वसुलीच्या रकमेत गैरव्यवहार

या गैरप्रकारात समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – भोजराज कामडी सरपंच महादवाडी

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मासळ – मदनापुर जील्हा परीषद क्षेत्रातील महादवाडी गट ग्रामपंचायतमध्ये शीपायांनीच कर वसुलीच्या रकमेत गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस आले आहे .
नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत नीवडणुकीत भोजराज कामडी यांच्या पॅनलने बाजी मारून एकहाती महादवाडी ग्राम पंचायतमध्ये सत्ता बसवली आहे .भोजराज कामडी हे महादवाडी ग्राम पंचायतचे सरपंच झाले. महादवाडी ग्राम पंचायत ही सात सदस्यीय असुन हरणी हे या ग्रामपंचायतला जोडले आहे . नवीन सरकार महादवाडी ग्राम पंचायतची बसताच काही दीवसातच या ग्राम पंचायतच्या करवसुलीच्या रक्कमेत येथील दोन शीपायांनी मोठा घोळ केल्याचे उघडकीस आले आहे .
या करवसुली , गृहकर , वीजकर , दीनांक १६ मार्चला आलेल्या तक्रारीनुसार गुंतीवार वीस्तार अधीकारी प.स. चिमुर यांनी १७ मार्चला चौकशी केली असता एकुण ४२६७९ रूपये सीध्दार्थ रामटेके व जनार्धन भागडे या दोन्ही शीपायांनी वसुल केल्याचे आढळले .सचीवांंनी सांगीतल्याप्रमाणे बँकेत फक्त ७००० रूपये जमा केले आहे .उर्वरीत ३५६७९ रूपये या वसुलीचा गैरकारभार या दोन्ही शीपायांनी केल्याचे दीसुन आले .सीध्दार्थ रामटेके यांच्याकडे १५९२४ रूपये जनार्धन भागडे यांचेकडे १९७५५ रूपये ही एवढी वसुलीची रक्कम लंपास केली .
ही गृहकर , वीजकर , पाणीकर , या वसुलीच्या रक्कमेचा घोळ सरपंच भोजराज कामडी यांना माहीत होताच या घोळामध्ये समावेश असणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्याकडुन गैरप्रकार केलेल्या रकमेची वसुली करण्यात यावी अशी मागणी महादवाडी ग्रा.पंचायतचे सरपंच भोजराज कामडी , ग्राम पंचायत सदस्य चरणदास दडमल , मंजुषा लोगडे , प्रीयंका राउत , वैशाली गुरूनुले , यांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close