सेवानिवृत्ती निमित्त -चंद्रपूर जि.प.च्या वित्त विभागातील लेखा अधिकारी दिपक जेऊरकरांचा भव्य सत्कार
राज्य कर्मचारी संघटनेच्या अनेक आंदोलनाचे केले जेऊरकरांनी नेतृत्व
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूरच्या जिल्हा परीषद मधील लेखा अधिकारी दिपक जेऊरकर हे दि. 30एप्रिल 2024 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सह-पत्निक वित्त विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने कन्नमवार सभागृहात शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला तदवतंच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व शुभकामना देण्यात आल्या!
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी विभुषित केले होते तर विशेष अतिथी म्हणुन राजू लभाने, राजेन्द्र
बुर्लावर, रामकृष्ण डाहुले ह्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
राजेन्द्र बुर्लावर, विवेक येरमे, प्रदीप जानवे, धर्मराव पेंदाम, पियूष भांदकक्कर, राजकुमार चिकटे आदींनी दिपक जेऊरकर यांच्या प्रशासकीय कार्याची तोंडभरून प्रशंशा केली . त्यांच्या प्रती गौरोवोद्गार काढुन त्यांना पुढील वाटचालीस या प्रसंगी शुभेच्छा दिल्या.
आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अमोल कडुकर यांनी केले.
सदरहु कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत घोरसारीया, दिपक सहारे, मेलविन रायपूरे, अजय डोर्लीकर, मंगेश वाघाडे, विनोद खंडाळे, मनिषा उपाध्ये, सविता कोहचाडे व वित्त विभागातील कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.शासकीय सेवेसोबच जेऊरकर यांनी राज्य कर्मचारी संघटनेच्या अनेक आंदोलनाचे आज पर्यंत नेतृत्व केले होते.ते स्थानिक तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार राजू धांडे यांचे जिवलग मित्र आहे.