ताज्या घडामोडी

पाथरी नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसतर्फे साखळी उपोषण सुरू

कोट्यवधींच्या निधीच्या हिशोबाची मागणी

जिल्हा ​प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद सदस्य, पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांच्या मार्फत आज दिनांक १२ ऑगस्ट २०२६ पासून नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. उपोषण स्थळी सर्व नगरसेवक,काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व पाथरी शहरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​”हिशोब द्या, हिशोब द्या, पाथरी नगर परिषदेचा हिशोब द्या” अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी नगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत प्रहार केला.या आंदोलनाला माजी आमदार बाबाजानी दुर्राणी,माजी नगराध्यक्ष जुनैद खान दुर्राणी आणि हबीब अन्सारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवले.


​नगर परिषदेला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगातील ८ कोटी ११ लाख रुपये निधीचा खर्चाचा हिशोब देणे व नगर परिषद सफाई कामगार व पाणीपुरवठ्यातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अदा करणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये बायोमायनिंगसाठी प्राप्त निधी ६८ लाख ७५ हजार रुपये निधीचा खर्चाबाबतचा हिशोब देणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या रस्ता अनुदान प्राप्त निधी ५८ लाख ९३ हजार रुपये खर्चाचा हिशोब देणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या मुद्रांक शुल्कपोटी १६ लाख रुपये प्राप्त झालेला निधी खर्चाचा हिशोब देणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये प्राप्त झालेल्या ५० कोटी निधीतील खर्चाचा हिशोब देणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नगर परिषद फंडातील (विविध कराची दैनंदिन वसुली) झालेला खर्चाचा हिशोब देणे.नगर परिषदेला प्राप्त झालेल्या रमाई घरकुल योजना प्राप्त निधी, लाभार्थ्यांना वाटप निधी व शिल्लक निधी याची यादी व बँक स्टेटमेंट मिळणे बाबत व इतर नगर परिषदेने विविध कामावर केलेला खर्चाची माहिती देणे. इत्यादी व अन्य ​विशेष महत्त्वाचे मुद्द्याची माहिती यामध्ये मागण्यात आली आहे.

====चौखट =====

​माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे खडे बोल

आठ महिन्यातच शहराचे नियोजन कोलमडले असून, सत्ताधारी शिवसेनेच्या नगराध्यक्षांचे आणि मुख्याधिकाऱ्यांचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत.पैसा कुठे गेला याचा त्यांनी लेखी हिशोब द्यावा,अन्यथा यानंतर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल,असा इशारा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिला.

===== चौखट ====

​शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी काही चुकीचे केले नसेल,तर त्यांनी शासनाचा एवढा पैसा कुठे खर्च झाला,याची सर्व माहिती द्यावी. कोणत्या भीतीपोटी ते समोर येत नाहीत? असा सवाल करत माजी नगराध्यक्ष जुनैद खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close