जमियते उलमाए हिन्द च्या वतिने तहसिलदार पाथरी यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
जमियते उलमाए हिन्द पाथरी च्या वतिने तहसिलदार पाथरी यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये हादगांव ता.पाथरी येथील पुरस्थितीची पाहणी व पंचनामा करुन सरसकट मदत जाहीर करण्यात यावि . , दि . ३१/०८/२०२१ मंगळवार रोजी पहाटे झालेल्या मुसळाधार पावसाने हादगांव ( नखाते ) ता.पाथरी येथील नागरिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे . त्यात अन्नधान्ये , संसारोपयोगी वस्तु , गुरेढोरे यांचे नुकसान न भरुन काढणारे आहे . काही घरांची पडझड व साचलेला गाळ यामुळे नागरिक अनेकानेक समस्यांशी तोंड देत आहेत . अशा या परिस्थितीत शासन व प्रशासन स्तरावर नागरिकांना धीर देणे गरजेचे आहे . त्यासाठी खालील प्रमाणे मदत करणे आवश्यक आहे . ज्या नाल्याचे पाणी गावत घुसले आहे त्या नाल्याचे ( पोखरा ) योजने अंतर्गत रुंदीकरण करणे . २ ) झालेल्या नुकसानीची पाहणी करुन तसेच सरसकट पंचनामे करुन सरसकट शासकीय मदत हस्तांतरित करणे . ३ ) घरांत पाणी घुसल्याने गहाळ झालेल्या महसुली , शासकीय , शैक्षणिक कागदपत्रांचे उतारे मिळावेत यासाठी उपाययोजना करणे इ . तरी मे . साहेबांनी उपरोक्त विषयी लवकरात लवकर कार्यवाही करुन पुरग्रस्तांना तातडीची शास्कीय मदत मिळवून देवून उपकृत करावे . हि विनंती . धन्यवाद ! ज्यामध्ये जमियते उलमाए हिन्द चे मौलाना खमरोद्दिन यासिन, पठान,शेख अजहर,मौलाना मुजाहिद,हाफेज ईलियास,शेख हाशम,मौलाना एजास,हाफेज अलि यांच्या स्वाक्षर्या आहेत