ताज्या घडामोडी

वडिलांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त लोकसेवेसाठी रुग्णवाहिका भेट


मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

तिरोडा। तालुक्यातील इंदोरा (निमगाव) येथे वडिलांचा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता समाजसेवेचा वसा जपत माजी सरपंच तथा शेतकरी-शेतमजूर संघटनेचे संस्थापक नितेश खोब्रागडे आणि त्यांचे बंधू ठेकेदार प्रेम खोब्रागडे यांनी वडील शालीकरामजी खोब्रागडे यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमातून पंचक्रोशीतील हजारो गरजू नागरिकांना विविध आरोग्य व सामाजिक सेवांचा लाभ मिळाला.

वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत रोगनिदान शिबिरात ईसीजी तपासणी, मोफत औषध वाटप तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि हाडांचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यावेळी रुग्णवाहिका लोकसेवेसाठी भेट देण्यात आली.कार्यक्रमात सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना सामाजिक संदेश देण्यात आला. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.दुर्गम भागातील नागरिकांना मिळणार आपत्कालीन आरोग्यसेवा
इंदोरा (निमगाव) हे गाव जंगल परिसरात असल्याने या भागातील नागरिकांना आपत्कालीन आरोग्यसेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.याबाबत बोलताना माजी सरपंच नितेश खोब्रागडे म्हणाले, “ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचविता यावे, या उद्देशाने ही रुग्णवाहिका लोकसेवेसाठी देण्यात आली आहे.”

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close