ताज्या घडामोडी

प्रयास लोकसंचालित साधन केंद्राची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

किसान अर्जुनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली

जिल्हा प्रतिनिधी:सजंय नागदेवे

तिरोडा : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), गोंदिया अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कार्यरत प्रयास लोकसंचालित साधन केंद्र, अर्जुनीची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच किसान अर्जुनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची पहिली सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे पंढरीच्या वारीच्या माध्यमातून स्वागत करून करण्यात आली.

त्यानंतर विविध उपक्रमांच्या स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्थानापन्न झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रेरणागीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर स्वागत नृत्य सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे फुलझाडे भेट देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रयास लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा मा. कुंदा शेंडे होत्या. किसान अर्जुनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा आशा लखन राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. चत्रभुजजी बिसेन (जि. प. सदस्य), मा. हुपराजजी जमाईवार (पंचायत समिती, तिरोडा), मा. चेतलालजी भगत (पं. स. सदस्य), मा. शिल्पा येळे (बीपीएम, तिरोडा), मा. शैलेंद्र जिद्देवार (लेखा अधिकारी, माविम गोंदिया), मा. कमलेश येळे (एमआयएस अधिकारी, माविम गोंदिया), मा. रोशनी व्ही. गायकवाड, प्रयास सीएमआरसी व्यवस्थापक रजत सर तसेच मा. सुनिताताई राहांगडाले (सरपंच, अर्जुनी) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.प्रयास सीएमआरसीच्या व्यवस्थापक मा. रोशनी गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत प्रास्ताविक केले. सीएमआरसीच्या सचिव मा. हर्षा ठाकरे यांनी संस्थेच्या उत्पन्न व खर्चाचा अहवाल सभेसमोर सादर केला. तसेच किसान अर्जुनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सचिव मा. रामकला पटले यांनी कंपनीच्या उत्पन्न व खर्चाचा अहवाल वाचून दाखविला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषणात रजत सर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य, कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणारी विविध प्रशिक्षणे तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.मा. शिल्पा येळे यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला मिळालेल्या चालनेबाबत मार्गदर्शन केले. मा. शैलेंद्र जिद्देवार यांनी आर्थिक व्यवहार व विविध आर्थिक बाबींविषयी माहिती दिली. मा. चत्रभुज बिसेन यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिलांना उद्यम आधार प्रमाणपत्र, विविध प्रमाणपत्रे तसेच शेतकरी उत्पादक कंपनीची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. सन २०२५-२६ मध्ये सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या बचत गटांचा, सर्वाधिक कर्ज-जोडणी करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींचा (सीआरपी), बचत गट तयार करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या सीआरपींचा तसेच सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या ग्रामसंघ लेखापालांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पारधी, सहयोगिनी यांनी केले. प्रास्ताविक मा. रोशनी गायकवाड, प्रभाग समन्वयक, अर्जुनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अल्काताई पटले यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close