ताज्या घडामोडी

चंद्रपूरच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास लाच देण्यास प्रोत्साहीत करणारे चंदू बगले एसीबीच्या ताब्यात

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पूरेपूर जाणीव व कल्पना असतांना देखिल चंद्रपूर इंदिरा नगर येथील मूळ रहिवाशी असलेले स्वस्त धान्य दुकाणदार चंदु रामचंद्र बगले यांनी एका प्रकरणात स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना चक्क दहा हजार रुपयांची लाच घेण्यास प्रोत्साहीत केल्या वरुन चंद्रपूर एसीबीच्या पथकाने आज मंगळवारला त्यांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहु घटने बाबत असे कळते कि या घटनेतील तक्रारदार स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.गैर अर्जदार चंदू रामचंद्र बगले या ५७वर्षिय स्वस्त धान्य दुकाणदारावर गुन्हा नोंद असुन सदरहु गुन्ह्याचा तपास तक्रारदार स्वतः करीत आहे.दरम्यान सदरहु तपासात सहकार्य करण्यासाठी व न्यायालयाने दिलेल्या हजेरी बाबत अटी व शर्ती पासून सुट देण्याकरीता तक्रारदारास (लोकसेवकास त्यांचे कर्तव्य अनुचितपणे करण्यासाठी,लाच घेण्यास प्रोत्साहीत करण्या बाबत)चंदू बगले यांनी चक्क दहा हजार रुपये देवून प्रोत्साहीत केले .परंतु तक्रारदारास ही रक्कम घेण्याची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी तक्रारदारांनी दि.१०एफ्रिलला चंद्रपूरातील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व बगले यांचे विरुध्द रितसर तक्रार नोंदविली .एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पथकाने या तक्रारीची आज दि.११एफ्रिल रोजी उपरोक्त प्रकरणात पडताळणी केली असता तपास कार्यात सहकार्य करण्यासाठी व न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्ती पासून सुट देण्याकरीता चंदू बगले हे तक्रारदास प्रोत्साहीत करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याच अनुषंगाने एसीबी पथकाने आज चंदू बगले यांना ताब्यात घेतले आहे .त्यांचे विरूध्द रामनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला असून या बाबतीत पुढील कारवाई सुरू आहे. सदरहु कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधिक्षक मधूकर गिते नागपूर प्रभारी पोलिस अधिक्षक शिल्पा भरडे चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले व त्यांचे पथकातील कर्मचारी रोशन चांदेकर, संदेशात वाघमारे,सतिश शिडाम , राकेश जांभुळकर, अमोल शिडाम ,रवि ढेंगळे , वैभव गाडगे , मेघा मोहर्ले , पुष्पा काचोळे यांनी यशस्वीपणे केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close