ताज्या घडामोडी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून परभणी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी

पिकांची पाहणी, शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा; शेतकऱ्यांना दिला धीर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पावसाने ओढ दिल्यामुळे परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज परभणी जिल्ह्यातील विविध भागांची भेट देऊन पिक परिस्थितीची पाहणी करत आहे. सर्वप्रथम त्यांनी गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील पिकांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.










