समाज मंदिर बांधकामाचे भूमिपुजन संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
सावली तालुक्यातील मौजा रैयतवारी जांब येथे खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या (2515) या विकास निधीतून मंजुर समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते दि.२० ऑक्टोंबर २०२३ ला रैयतवारी जांब येथे कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी देवी मा शारदा मातेचे दर्शन घेत या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत माझ्या स्थानिक (2515 ) या विकास निधीतून समाज मंदिराला पाच लक्ष रुपये मंजुर केले. गावकऱ्यांनी यांचा चांगला लाभ घ्यावा. अस व्यक्तव्य यावेळी केले.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,भाजपा तालुकाध्यक्ष तथा ओबीसी चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,जेष्ट नेते भाषकर ठाकुर,ज्ञानदेव हुलके,अशोक पा.चौधरी पोलीस पा,ग्रा. प.सदस्य श्रीकृष्ण बोदलकर,शांताराम भांडेकर, भाषकर धानफोले,हरीभाऊ भांडेकर,नवनाथ वासेकर,महिला भगिनीं तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.