ताज्या घडामोडी

शालेय कराटे स्पर्धेत न्यू सेल्फ डिफेन्स अकादमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

विविध गटांत १५ खेळाडूंनी पटकावले प्रथम क्रमांक

तिरोडा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा २०२५-२६चे आयोजन २३ सप्टेंबर रोजी तिरोडा येथील तालुका क्रीडा संकुलात करण्यात आले. या स्पर्धेत न्यू सेल्फ डिफेन्स अकादमी, तिरोडाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.

१४ वर्षांखालील गटात हर्षिता शाहारे, समृद्धी वाडघुले, सोनाली बरियेकर, गोकुल घरजारे, मयंक शाहारे आणि प्रियांश नागपुरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.१७ वर्षांखालील गटात लतिका सेरकुरे, देविता लिल्हारे आणि लावण्या पंधाराम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात उन्नती भोयर आणि लेखनी पारधी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.१९ वर्षांखालील मुलांच्या गटात ओम डहाले याने प्रथम क्रमांक पटकावला, तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात धनश्री परतेती आणि तृषिता शाहारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या यशाबद्दल खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रशिक वैद्य, आकाश शाहारे, दीपक घरजारे तसेच कराटे डो असोसिएशनचे सचिव चंद्रप्रकाश प्रजापती यांना दिले.खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, तसेच माधुरी राहंगडाले, प्रदीप मेश्राम, विकेश मेश्राम, अमन नंदेश्वर, राजेश वरठे, प्रज्ज्वल वैद्य आणि अतुल बिनझाडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close