ताज्या घडामोडी

कोडेलवारा येथे ढिवर समाजाचे लक्षवेधी आंदोलन

क

सदस्य नोंदणीचा मार्ग मोकळा

जिल्हा प्रतिनिधी:सजंय नागदेवे

तिरोडा ; कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमार बांधवांच्या प्रलंबित सदस्य नोंदणीच्या मागणीसाठी कोडेलवारा तलावाच्या पाळीवर शांततेच्या मार्गाने संयुक्त लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. प्रहार संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू झाले.आंदोलनाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ढिवर समाजातील पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय मच्छीमार संस्था, र.न. १०१ मधील सभासद नोंदणीचा प्रश्न मार्गी लावावा, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. दुपारी ३ वाजेपर्यंत मागण्यांची दखल न घेतल्यास सायंकाळी ५ वाजता सहकार मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.दरम्यान, आंदोलनस्थळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस विभागाचे अधिकारी तसेच तहसीलदार यांनी तातडीने हस्तक्षेप केला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. सहाय्यक आयुक्त, मत्स्यपालन कार्यालय, गोंदिया येथील मारबदे साहेब तसेच सहाय्यक दुय्यम निबंधक (दुग्ध), भंडारा येथील सहारे साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना आंदोलनस्थळी येण्याची विनंती करण्यात आली.


त्यानंतर सुमारे एक ते दीड तासात संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. गावाचे सरपंच तसेच ढिवर समाजातील पुरुष व महिलांच्या उपस्थितीत संबंधित विषयावर कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपही झाले. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सभासद नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.तसेच सहाय्यक आयुक्त मारबदे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर संस्थेची नियमानुसार तांत्रिक तपासणी करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले.
या आंदोलनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमार बांधवांच्या संस्था सभासद नोंदणीचा मार्ग मोकळा झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनात प्रामुख्याने प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तालुका मीडिया प्रमुख मिथुन वासनिक, रुग्णसेवक लकेश तुमसरे, कोडेलवारा सरपंच भगत, विनोद कोबडे, रगलाल मारबदे, हेमराज मारबदे, पुरुषोत्तम मेष्राम, अरविंद कोबडे यांच्यासह ढिवर समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *