मजरा अमरपुरी गट ग्राम पंचायत येथील सरपंचासह २० महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश
चिमूर तालुक्यात राष्ट्रवादी महिला आघाडी चा झंझावात.
ग्रामीण प्रातिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
गाव पातळीवर संघटना मजबुतीसाठी प्रत्येक गावात आणि खेड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पोचविण्यासाठी चिमूर तालुका अध्यक्ष प्रियंका बहाद्दूरे यांच्या नेतृत्वात
जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे राष्ट्रवादी उपक्रम सुरू केले आहे. या कार्यक्रमाची सुरवात दि, २७ जानेवारी मौजा मजरा येथील सरपंच करूना सुभाष रणदिवे यांच्या घरी सभा घेऊन महिलांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच गावातील अनेक समस्यावर विचार करण्यासाठी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी क्रिष्णा बहादुरे , हंसराज रामटेके , अमित कराडे ,दीपा कराडे उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आणि प्नियंका बहादुरे (राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष चिमुर) यांच्या नेतृत्वाखाली व कार्यप्रणाली वर विश्वास ठेवित सरपंचासह २० महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडयाळ हाताला बांधली यामध्ये
करूणा सुभाष रणदिवे (सरपंच गट ग्रामपंचायत मजरा),बेबी अरूण नन्नावरे,पंचफुला मुकुंदाजि नन्नावरे ,अर्चना वामन राणे, कुसूम श्रीहरी मेश्राम,शांताताई रामचंद्र नन्नावरे,पार्वता सदाशिव नन्नावरे,अस्मिता पीतांबर नन्नावरे ,लताताई कैलास चौके, सुमित्रा मानीकराव चौधरी,उर्मिला ताई विनोद रणदिवे,सुमित्रा अंकुश नन्नावरे, सुगंधाताई कार्तिक शेन्डे,दौपदा सुधीर माडवकर, वनिताताई माधवजी नन्नावरे,सुनीताताई भास्कर नन्नावरे, उज्वलाताई संदीप माडवकर, शांताताई शामराव माडवकर,सिमा ताई सचिन राणे, कमलताई सूर्यभान माडवकर
या सर्व महिलांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये हंसराज रामटेके,क्रिष्णा बहादुरे, अमित कराडे, दिपाताई कराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून हार्दिक स्वागत केले.