ताज्या घडामोडी
लिंबा येथे सावित्रीमाई एकल महिला संघटनेची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनाक 15 मार्च 2024 रोजी पाथरी तालुक्यातील लिंबा येथे सावित्रीमाई एकल महिला संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैतकिमध्ये एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी लघु उद्योग निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या महामंडळ यांच्याकडून वाटप होणारे कर्ज , शासकीय योजना ची माहिती तसेच एकल महिलेचे सामाजिक,राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक सक्षमीकरण झाले पाहिजे या विचाराने महिलांना माहिती देण्यात आली.
यावेळी सावित्रीमाई एकल महिला संघटनेचे प्रमुख रघुनाथ कसबे व सावित्रीमाई एकल महिला संघटनेच्या तालुका अध्यक्षा उषा ताई यादव या होत्या यावेळी लोणी येथील एकल चेतक महिला कार्यकर्त्या मायंदले ताई यांना पे टू पे संस्थे मार्फत कन्यादान योजने अंतर्गत माननीय सरवदे सर यांच्या प्रेरणेने एक भिंतीवरचे घड्याळ बक्षीस देण्यात आली .