क्रांतिवीर शहिद बापुराव पुल्लेशुर शेडमाके यांच्या 189 वी जयंती निमित्त घुग्घुस येथे पाणपोई सुरू करण्यात आली
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दि 12 मार्च 2022 रोजी आई जिजाऊ हेल्पींग हॅन्ड आँर्गेनाईजेशन च्या माध्यमातून क्रांतीवीर बापूराव पुलेश्वर शेडमाके यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली या जयंती चे औचित्य साधून घुग्घुस येथे डॉ. सोनटक्के दवाखाना चा बाजूला पाणपोई सुरू करण्यात आली आहे.दवाखान्यात ये-जा करणाऱ्या व घुग्घुस येथे उष्णतेमुळे तहानलेल्या गरजु व्यक्तीला वेळेवर पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून क्रांतिवीर बापुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्त घुग्घुस वासियांनकरीता पाणपोईची सुविधा करण्यात आली व इतर पशुपक्षा साठी व मुक्या जनावरांसाठी सुध्दा येथे पाण्याची सुविधा करण्यात आली व हा एक नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला असून जनावरे पशु पक्षी आणि मानवता या उपक्रमातून दिसुन येते या कार्यक्रमात उपस्थित आई जिजाऊ अ हेल्पींग हॅन्ड आँर्गेनाईजेशन संस्थापक कृष्णा पाईकराव अध्यक्ष नागेश पाईकराव उपाध्यक्ष ललित गाताडे सहसचिव प्रितम ठेंगणे सिध्दार्थ गुडदे अंकित नालमवार मंजूनाथ मडावी आकर्षण गाताडे आदी उपस्थित होते.