ताज्या घडामोडी

ग्राहकप्रिय प्रधान तंत्रज्ञ शेख शफी यांना भावनिक निरोप

महावितरणच्या मानवत येथील कार्यालयात प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले शेख शफी यांची पालम येथील उपविभागीय कार्यालयात बदली झाल्याने त्यांना सहकारी, मित्रपरिवार व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील सेवावाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
शेख शफी यांनी मानवत येथे कार्यरत असताना आपल्या शांत, संयमी, हसमुख आणि सेवाभावी स्वभावाने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. महावितरणच्या ग्राहकांचे कोणतेही काम असो, ते तत्परतेने पूर्ण करण्यासाठी ते सदैव पुढाकार घेत असत. वीजपुरवठ्याशी संबंधित कोणतीही अडचण निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे ग्राहकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली होती.
त्यांच्या बदलीची बातमी समजताच अनेकांनी भावनिक भावना व्यक्त केल्या. पालम येथेही ते आपल्या कार्यकुशलतेने व सेवाभावी वृत्तीने नागरिकांचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी हाफेज लतीफ बागवान, हाफेज मेराज, मोहम्मद रफिक बागवान, अयुब खान, आवेज बागवान, फयुम बागवान, मोबीन बागवान आणि एजाज खान यांनी शेख शफी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close