ताज्या घडामोडी

योगेश्वरी शुगर्सची चाके यावर्षी पासून दुप्पट वेगाने सुसाट फिरणार;मोळी पुजन कार्यक्रम संपन्न;प्रत्यक्ष गाळपाला प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी:-माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात संस्थापक अध्यक्ष स्व अशोकसेठ सामंत यांनी एक हजार मेट्रीक टन गाळप क्षमतेच्या योगेश्वरी शुगर्स या लक्ष्मीनगर लिंबा येथील साखर कारखान्याची विक्रमी अकरा महिण्यात उभारणी करुन या भागात अर्थिक क्रांती आणून शेतकरी,कामगारांचे जिवनमान ऊंचावण्याचे कार्य केले.आता हा साखर कारखाना माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांनी गत चार वर्षा पुर्वी घेतला असून. या भागातील ऊसाची उपलब्धता पहाता गाळप क्षमता वाढवने गरजेचे वाटल्याने अगदी कमी ५-६ महिण्यात या साखर कारखान्याची गाळप क्षमता दिड हजार मेट्रीक टनावरुन आता प्रतीदिन अडीच हजारावर मेट्रीक टन प्रतिदिन गाळप क्षमता करून गाळपाची क्षमता दुप्पट केल्याने शेतक-यां मधून आनंद व्यक्त होत असून बुधवारी चेअरमन माजी आ आर टी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे जेष्ठ बंधू एम टी देशमुख नाना यांच्या हस्ते विधिवत मोळीपुजन करून योगेश्वरी शुगर्सच्या २१ व्या ऊसगळीत हंगामाची प्रत्यक्ष सुरूवात केली.

या वेळी एच टी देशमुख साहेब,जे टी भाऊ देशमुख,चेअरमन आर टी देशमुख जीजा,संचालक अभियंते राहुल आर देशमुख,डॉ अभिजित देशमुख,कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख,प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे,सुदामराव सपाटे, मनोज देशमुख, सचिन देशमुख,तुषार देशमुख,बबनराव सोळंके,सुदाम अप्पा देशमुख,अच्युत महाराज शिंदे मोहनदादा देशमुख,मुंजाभाऊ नाना टाकळकर,माजी सभापती तुकारामजी जोगदंड,डॉ चौधरी,शेख मुश्ताख,साजेद सर, सरपंच विष्णू शिंदे,बालासाहेब सहजराव,पत्रकार किरण घुंबरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वर्षी पासुन ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून नविन प्रणाली विकसित करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी तेजन्यूजशी बोलतांना देऊन यात शेतक-यांच्या उसाच्या नोंदी व प्रत्यक्ष क्षेत्र या बाबत गुगल सॅटेलाईट व्दारे अजूक तपासनी होणार असल्याने ऊस तोडणी कार्यक्रम मागे पुढे होणार नसल्याचे ते म्हणाले. या मुळे नोंद ही वेळच्या वेळी होऊन ही नोंद एकदा सेव्ह झाल्यास त्यात कोणाला कोणताही बदल करता येणार नाही.यात शेतकरी आणि स्लिपबॉय यांचे फोटो लागवडी वेळी थेट शेतात काढलेले असल्याने बांधावरच लागवड नोंद होऊन लागवड तारीख पडणार आहे.

या सोबतच ऊसाची तोड होत असतानांच ऊस वाहतुक करणा-या वाहनाचा नंबरटेक होणार आहे.या मुळे वाहाने मागे पुढे होणार नाहीत यात शेतक-यांच्या ताज्या ऊसाचे वजन होऊन त्यांचा फायदा होणार आहे.

ऊस उत्पादक आणि वाहतुक,तोडणी ठेकेदारांना एसएमएस सेवे व्दारे वाहन काट्यावर जाताच वजन किती भरले याचा एसएमएस येणार असल्याचे देशमुख म्हणाले.या मुळे एकुन किती ऊस आपल्या नावे पडला याची माहिती आता एका क्लिक वर मिळेल. यात स्लिपच्या बेरजा करण्यात आणि आपला किती ऊस आला हे पाहाण्या साठी कारखाना ऑफिसला चकरा मारण्याची तीन्ही घटकांना अवश्यकता राहाणार नाही.या सोबतच ऊस वाहतुक करणा-या ट्रक-ट्रॅक्टर ड्रायव्हर ने किती डिझेल घेतले याची ही माहिती आता घरबसल्या मिळणार असल्याने.आणि कारखाना कार्यालयाकडे चकरा मारण्याची गरज भासणार तर नाही. या शिवाय माझी लागवड आधी त्याची नंतर हा वाद ही होणार नाही. सर्व काही ऑनलाईन असल्याने नियमा प्रमाणे होणार असून यात स्वत:शेतक-यांचा मोठा अर्थिक फायदा होणार असून. टोळीचे नियोजन हे शेतकी विभागावरच नियमा प्रमाणे राहील.परस्पर पैसे देऊन टोळी पळवणे तोडणी कामगारांना पैशाची लालूच देण्याचे प्रकार ही आपोआप बंद होणार असल्याने या नाविन्य पुर्ण ऑनलाईन प्रणालीमुळे सर्वांचाच त्रास वाचणार आहे.

या वर्षी पुर्ण क्षमतेने साखर कारखाना चालणार असून शेवटच्या ऊसाचे गाळप होई पर्यंत क्लिनिंग सुद्धा घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगून मागिल विस वर्षा पासुन सर्वच घटकांनी सहकार्य केले तसे या पुढेही सहकार्य मिळेल असा विश्वास कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला.

या वेळी ऊस उत्पादक नारायन धनसिंग राठोड,ठेकेदार कमलबाई राजेभाऊ राठोड,गाडीवान सचिन दिगंबर राठोड,ऊस उत्पादक श्री पंडितगुरू पार्डीकर संस्थान लासीनाचे नारायनदास परांडे,वाहतुक ठेकेदार विठ्ठल त्र्यंबकराव कदम,तोडणी ठेकेदार सरवर शिरुमियाँ शेख,बागायतदार परविन बेगम शेख मुश्ताख,मुंजाभाऊ नाना टाकळकर,ड्रायव्हर अमोल,यांचा संचालक अभियंते राहुल आर देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी कल्याणराव देशमुख,मंकाजी शिंदे,उत्कर्ष दळवे,सुशिल घुंबरे,कार्तिक घुंबरे,योगेश नवघरे,पदमाकर मोकाशे,प्रकाशराव घुंबरे,भगवानराव होके,आनंदनगरचे सरपंच विजय पवार यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी जनरल मॅनेजर प्रकाश चांदगुडे अधिकारी प्रमोद देशमुख,विलास आवरगंड,वसंत चरमळ,राजकुमारसिंह तौर,मुकेश रोडगे,नंदिप भंडारे ,अनिल सिसोदिया,पांडूरंग जाधव,रामराव कदम,चैतन्य महाजन, हारकाळ,संजय महाजन,वसंत लाखे,माणिक डोंबे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमा साठी ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोड वाहतुक ठेकेदार, कर्मचारी,कामगार आदिंची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close