जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संताजी मंच नेरी यांच्या वतीने आज साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री प्रभाकर पिसे सर मुख्याध्यापक लोहारा तसेच वसंतरावजी आष्टनकर सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून हारार्पण करून ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्याही एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खर्या अर्थाने संत विचारांची गरज आहे. याप्रसंगी श्री संताजी महाराज की जय अशा घोषणा देऊन तेली ओबीसी समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे यासुद्धा घोषणा याठिकाणी देण्यात आल्या आणि आमच्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला जागृत करण्यासाठी या ठिकाणी विचार मांडण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी राजू पिसे, निखील पिसे, विलास हरिभाऊ पिसे , रवी चुटे सुनिल वसंतराव पिसे, पिंटू खाटीक ,जय वाघे ,मंगेश वासेकर, तसेच इतर तेली समाज बांधव या ठिकाणी हजर होते.