नागभीड चा युवक जितेंद्र कर्जाच्या प्रतिक्षेत झाला कर्जबाजारी
मुख्य संपादक:कु.समिधा
भैसारे
जितेंद्र ने नागपूर येथ हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण पुर्ण करून विदेशात काम केले आहे पण आपल्या देशाची व गावाची ओढ त्याला भारतात परत घेऊन आली जितेंद्र ने नागभीड येथे येऊन भागीदारीत लाखो रुपये खर्च करून मसाल्याचा उद्योग सुरू केला त्यासाठी त्याने १५ लाखाची जागा विकत घेतली उद्योग सुरू करण्यासाठी त्याला जवळ जवळ २५ लाखाचा खर्च आला उद्योग वाढवन्यासाठी अधीक भांडवलाची गरज होती म्हणुन त्याने बँक ऑफ इंडिया शाखा नागभीड येथे स्टॅन्डअप इंडिया या योजने अंतर्गत कर्जासाठी अर्ज केला बँकेने त्याला त्यासाठी शेती अकृषक करायला लावली त्यासाठी ही त्याला चार लाख रुपयाचा खर्च आला त्यानंतरही त्याला वेगवेगळ्या कागद पत्रासाठी हेलपाट्या मारायला लावल्या यावरच ते थांबले नाही तर त्याच्या आईच्या नावाने असलेले कर्ज त्याला भरायला लावले
या संपुर्ण प्रकारात चार वर्ष निघुन गेले २०२० मध्ये संपुर्ण कागदपत्रे घेऊन व्यवस्थापकाकडे गेला असता तरीही कर्ज मंजुर झाले नाही त्यानंतर जितेंद्र ने बँकेच्या वरीष्ठाकडे धाव घेतली त्याचाही काही फायदा झाला नाही शेवटी जितेंद्र ला सांगण्यात आले तुम्ही कागदपत्राची पुर्तता केली नाही पण त्यानी सादर केलेली कागदपत्रे त्याला बैंकेने वापस केली नाही प्रसार माध्यमात याची माहीती झाल्यावर त्याला पुन्हा बँकेत बोलवण्यात आले तेव्हा त्याला तारण ठेवण्यासाठी सांगण्यात आले महत्वाचे म्हणजे स्टॅन्ड अप योजनेत दोन कोटीच्या कर्जाची हमी शासन घेते कर्ज मिळवण्यासाठी चार वर्ष जितेंद्र ने बँकेच्या हेलपाट्या मारल्या या काळात त्याचा सुरु असलेला व्यवसाय बंद पडला त्या साठी त्याला आपले स्वताचे घर विकावे लागले त्याच्या कुटुंबियांना भाडयाच्या घरात राहायची वेळ आली आहे अशी व्यथा जितेंद्रनी चंद्रपूर येथे प्रत्रकार परिषदेत मांडली आहे.