ताज्या घडामोडी

विट्ठलवाडा येथील प्रवेशद्वाराला ट्रक ची धडक

प्रवेशद्वार हलताच लोकांनी केली ओरड

शहर प्रतिनिधी :प्रमोद दुर्गे
9834754521

गोंडपीपरी -तालुक्यातील विट्ठलवाडा येथे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार दर्शनी भागावरच असल्याने विट्ठलवाडा गावात प्रवेश करताना वा बाहेर पडताना इथूनच जावे लागते. या मार्गावर वाहतूक वाढली आहे.
असे असतानाच
वढोली मार्गे विठ्ठलवाडा येथे वाहन क्र.mh 36 f 0965 ह्या लांब पल्याची ट्रकमध्ये पोकलंड मशीन घेऊन येत असताना विट्ठलवाडा गावाच्या दर्शनी गेट ला पोकलंड मशीनचा शीर्ष भाग धडकला त्यामुळे गेट पूर्णतः हलला. आणि पडता पडता थोडक्यात बचावला .
लोकांनी गेट पडते -पडते म्हणत आरडाओरडा केल्याने वाहन चालकाने वेळीच गाडी बंद केल्याने गेट पडता पडता वाचल्याने मोठी दुर्घटना टळली .
विट्ठलवाड़ा बसस्थांनकालगत आष्टी ,गोंडपीपरी,ला जाण्यासाठी ह्या बसस्थांनकावर प्रवाशाची नेहमी गर्दी असते. गेट च्या बाजूलाच पान टपरी आणि नाश्त्याची टपऱ्या असल्याने लोक गर्दी करतात. मात्र वेळीच चालकाने गाडी बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.
सदर ट्रक वाहन चालकाला गेटतुन वाहन काढायचे असेल तर ट्रक रोडच्या खालील बाजूने नेन्याचा सल्ला देताच चालकाने सदर वाहन मागे मागे आणत रोड च्या खाली उतरवले व मोठ्या शिताफीने अखेर गेट मधून बाहेर काढले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close