ताज्या घडामोडी

नवखळा जिल्हा परिषद शाळेची खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य चोरी

तालुका प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड पंचायत समिती अंतर्गत नवखळा जिल्हा परिषद शाळेची खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य चोरी झाली, तीघावर गुन्हा दाखल करण्यात आला, आज न्यायालयाने तीन्ही आरोपी ब दिली एक दिवसाची पोलीस कोठडी, दि. ४ सप्टेंबर ला सायंकाळी संबंधित मुख्याध्यापक शाळेला कुलूप लावुन आपल्या घरी गेला असता, रात्री ११ च्या सुमारास गावातील ललित आकाश नान्हे व बाल्या परमानंद अलमस या युवकांनी नवखळा जिल्हा परिषद शाळेतील संगणक खोली ची खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य व एलईडी चोरी केली. याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळ गाठून तपासाचे चक्र फिरवुन तीन्ही आरोपीला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात मनोज फत्रु यांच्या घरी चोरी गेलेले काही साहित्य आढळून आले, पुन्हा चोरी गेलेले काही साहित्य अजूनही पोलीसांच्या हाती लागायचे आहेत. आज तीन्ही आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, पुढील तपास सुरू आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close