ताज्या घडामोडी

मजरा( लहान )येथील बुद्ध विहारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील सालोरी-येंन्सा ब्लॉक मजरा ( लहान) येथील बुद्ध विहारात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात व धूम धडाक्यात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने मजरा (लहान) येथील ग्रामपंचायत चे सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, ग्राम विकास अधिकारी एकनाथ चाफले सर, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर, हर्षद निब्रड, राजेंद्र बोढे, प्रतिभा मानकर, अनिता आत्राम, बौद्ध पंचकमिटी महिला मंडळाच्या अध्यक्षा रागिनी मानकर, पत्रकार ग्यानीवंत गेडाम, माजी ग्रामपंचायत सदस्य आबा रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळेस उपस्थित पाहुणे मंडळींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी बुद्ध वंदना घेण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी गावातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका व आंबेडकरी अनुयायी बालक- बालीका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सायंकाळी बौद्ध पंचकमिटी च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व ते योग्य प्रकारे पार पडले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close