ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी नगर परिषदच्या नळाच्या पाण्याला हिरवट छटा

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे
मागील काही दिवसापासून नगर परिषद ब्रम्हपुरी च्या नळाच्या पाणी हा घरगुती बोरवेल च्या पाण्यापेक्षा गढूळ दिसत आहे. यामुळे नगरवासियांमध्ये संम्रभ निर्माण झाले आहे. पाण्यामध्ये वेगळ्याच हिरव्या रंगाच्या छटा दिसत आहेत. त्यामुळे हा पाणी पिण्यायोग्य आहे का असं नागरिकांना प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी ब्रम्हपुरी नगरपरिषद प्रशासनाने या पाण्याची तात्काळ अधिकृत प्रयोगशालेत तपासणी करून त्याचा अहवाल नगरवासियांसमोर जाहीर करावा. कारण शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे. लहान मुल, जेष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये. लवकरात लवकर प्रयोगशाळेचा अहवाल सादर करावा अशी नगरवासीयांची मागणी आहे.









