शेतकऱ्यांचा वन जमिनीची मोजणी करून द्या
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
21 जानेवारी 2022 रोजी अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मौजा- आसा गाव व गोटटे लिंगामपल्ली हद्दीत असणारा तलावातील हत्ती कॅम्पचा दौरा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब व माजी जि. प. अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांनी दौरा केले.
त्या दरम्यान सण 2005 पुर्वी वन जमिनीची अतिक्रमण केलेले कमलापूर, रेपणपल्ली, राजाराम,खांदला,येरामनार,मंडरा,दामरंचा इत्यादी ग्रामपंचायत मधील सर्व शेतकरी सुद्धा आले होते.
तेव्हा माननीय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम.पझारे यांच्याशी सण 2005 पुर्वी अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांचा वन जमीन मोजणी करण्याबाबत चर्चा केले आहे. तेव्हा कमलापूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी सर्व शेतकऱ्यांसमोर म्हणाले की, सोमवारी दिनांक 24 जानेवारी 2022 पासुन अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांचा वन जमीन मोजणी सुरू करायला मी माझे सर्व वनपाल आणि वनरक्षकांना आदेश देतो असे म्हणाले. तेव्हा अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम व भाग्यश्री ताई आत्राम यांना धन्यवाद केले आहे.
महत्त्वाचा म्हणजे अहेरी विधानसभाचे लोकप्रिय आमदार धर्मरावबाबा आत्राम व माजी जि. प.अध्यक्ष सौ.भाग्यश्री ताई आत्राम यांनी मागील सात,आठ पासुन मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली, मा. उपविभागीय अधिकारी साहेब अहेरी व वन विभागातील अधिकारी यांच्याकडे अनेकवेळा लेखी पत्र देऊन, 2005 पुर्वी अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांचा जमीनी मोजणी करणे, वनहक्क अहवाल देने व जमिनीची पट्टा साठी लागणारे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडून उपलब्ध करून देण्याबाबत ची सर्व आदेश अधिकाऱ्यांकडुन काढायला प्रयत्न केले आणि तसे आदेश ही काढण्यात आले आहे. म्हणून आता सण 2005 पुर्वी अतिक्रमण केलेले सर्व शेतकऱ्यांची वन जमीनीची मोजणी होणार आहे.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष श्री लक्ष्मण येररावार, अहेरी पं.स.सदस्य श्री राकेश
पननेला, येरमणार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, राजाराम चे माजी सरपंच श्री विनायक आलाम, कमलापूर चे माजी उपसरपंच श्री शंकर आत्राम, श्री मंताय्या आत्राम- ताटीगुडाम, श्री बाबुराव तोर्रेम- दामरंचा, श्री तिरुपती कुळमेथे, जयराम आत्राम- राजाराम, श्री अशोक आत्राम, श्री रंगा तलांडी- गोलाकर्जी, श्री सदु पेंदाम- खांदला, श्री नारायण आत्राम- पत्तीगाव, श्री विजय आंबिला- रायगटटा, श्री लक्ष्मण झाडे- मरनेल्ली, श्री रवी गावडे, श्री डोलू गावडे- कोरेपल्ली, श्री लालचंद तलांडी- कोडसेपल्ली, श्री लच्या आत्राम- आसा, श्री हन्मंतु आलाम, श्री गंगाराम तोर्रेम- भंगारामपेठा, सौ. अनिता आलाम, सौ. मंगला आत्राम- राजाराम तसेच कमलापूर, राजाराम, दामरंचा क्षेत्रातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.