अनेक युवकांचा आप मध्ये प्रवेश नागभीड येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न
आम आदमी पार्टी कडून जनतेच्या खूप अपेक्षा, लोकांसमोर आप हाच भविष्यातील पर्याय – प्रा. डॉ. अजय घ. पिसे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
सध्याच्या राजकीय घळामोळीनचा आढावा घेत असता, सर्वसामान्य जनता ही आम आदमी पार्टी कडे खूप अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत त्यामुळे आप च्या स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली व पंजाब सरकारच्या कार्यक्षमतेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात खरा बदल हा फक्त आम आदमी पार्टीच करू शकते असा लोकांचा ठाम विश्वास होत आहे. म्हणूनच लोकांसमोर आप हाच भविष्यातील योग्य पर्याय आहे असे विचार आप चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी नागभीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
नागभीड येथे आम आदमी पार्टी चा तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याप्रसंगी नागभीड तालुक्यातील अनेक युवकांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या उपस्थितीत योगेश सोनकुसरे, प्रमोद भोयर, दिगांबर कानकावार, अक्षय उईके, मुकेश मसराम, मंगेश आमले, अंकित पोत्रजवार, कुणाल धानोरकर, संदीप गायकवाड, विक्की मेश्राम यांच्यासह एकूण तीस युवकांनी आम आदमी पार्टी च्या विचारधारेला अंगीकारून आप मध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आप चे जेष्ठ नेते श्री सुरेशजी कोल्हे, नानक नाकाडे व आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घ. पिसे उपस्थित होते. याप्रसंगी आम आदमी पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांच्या भागातील समस्या जाणुन घेतल्या. आगामी निवडणुकीसंदर्भात आराखडा तयार करून कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.